Abha Helth card information in marathi – नमस्कार मित्रांनो ,माझ्या site वर तुम्हच स्वागत आहे.आज आपण या पोस्ट मध्ये खूप अशी महत्वाची माहिती पाहणार आहोत.मित्रांनो तुम्हाला आयुष मान भारत कार्ड विषय माहिती असेल.आज आपण अशाच एका कार्ड बद्दल जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आज आपण ‘आभा हेल्थ कार्ड ‘ या कार्ड विषय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.नक्की या कार्ड चे आपल्याला काय फायदे आहेत . या कार्ड चे काय वैशिष्ट आहे.या कार्ड साठी कसे अप्लाय करायचे या विषय संपूर्ण माहिती आपण या लेखात आपण पाहणार आहोत.माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे नक्की वाचा. चला तर पाहूया …..आभा हेल्थ कार्ड विषय संपूर्ण महिती…
आभा हेल्थ कार्ड (Abha Helth card information in marathi) हे कार्ड योजना एक प्रकारे नागरिकांच्या आरोग्याची कुंडलीच आहे.महाराष्ट्राचे “मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे” यांनी तर सर्व महाराष्ट्रातील जनतेला लवकरात लवकर हे कार्ड बनउन घेण्याचे आवाहन केले आहे.
Abha Helth card information in marathi
अनुक्रमणिका
1) आभा हेल्थ कार्ड चे महत्व.
2) आभा हेल्थ कार्ड काय आहे ते पहा.
3) आभा हेल्थ कार्ड कसा बनवायचा.(online )
4) आभा हेल्थ कार्ड Download कस करायच.
5) आभा हेल्थ कार्ड ची सुरक्षितता
“या कार्ड चे महत्व म्हणजे या कार्ड द्वारे रुग्णांची सर्व माहिती आपल्या जपून ठेवता येईल.तसेच या कार्ड च्या मदतीने कोणताही डॉक्टर आपल्या आरोग्याच्या संबंधीचे सर्व रिकॉर्ड चेक करू शकतात.
याचा अर्थ असा हि या कार्ड द्वारे कोणत्याही रुग्णांचा वैद्यकीय इतिहास डॉक्टरांना सहज शोधता येणार आहे.” अस माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आपल्या statement मध्ये सांगितलं आहे.
पण या आभा हेल्थ कार्ड विषय अनेकांना अजून काहीच माहिती नाही.नक्की या आभा कार्ड चे फायदे काय ? हे कसे कार्ड काढायचे ? आपण आज याच विषयावर माहिती पाहणार आहोत.
आभा हेल्थ कार्ड नक्की काय आहे ते पाहूया….. !
आभा (ABHA) म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर. सर्वात महत्वाच म्हणजे हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे या मध्ये सर्व नागरिकांच्या आरोग्याची संबंधित माहिती साठवली जाते.
हे कार्ड आपल्या आधार कार्ड प्रमाणे आणि या वर 14 अंकी नंबर असेल.याच नंबरचा वापर करून रुग्णांची सगळी मेडिकल माहिती डॉक्टरांना समजली जाईल.
यामध्ये कोणत्या व्यक्तीवर कोणत्या आजवर इलाज झाला ? तो कधी व कोणत्या दवाख्यान्यात झाला ? कोणकोणत्या टेस्ट करण्यात आल्या ? कोणती औषधे देण्यात आली.रुग्णांच्या आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत? तो कोणत्या कोणत्या आरोग्याविषयक योजनेशी जोडला गेला आहे? हि सगळी माहिती या कार्ड द्वारे डिजिटल पद्धतीने मिळणार आहे.{Abha Helth card information in marathi}
या कार्ड च्या युनिक आयडीचा वापर करून डॉक्टर तुमच्या आरोग्याशी संबंधित डेटा पाहू शकतील.सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मध्ये आपली मरजी असेल तरच आपण माहिती भरण्यास सांगू शकतो.कारण या साठी तुम्हची संमती अनिवार्य आहे.
त्याच प्रमाणे तुम्ही केव्हाही तुमचे आरोग्याविषय असलेले डिजिटल रिकॉर्ड दिलीट देखील करू शकता. या कार्डचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला दवाखान्यात जाताना आधीच्या डॉक्टरांची चिट्ठी अथवा गोळ्यांचे कागद सोबत घेऊन जाण्याची गरज पडणार नाही.
डॉक्टरांना तुम्ही तुम्हचा आभा नंबर सागितला कि ते तुम्हचा पूर्वीचा आरोग्यविषयक संपूर्ण डेटा पाहू शकतील.
याचा फायदा असा होणार आहे कि जर तुम्हच्या कडे तुमचे जुने रेकॉर्ड नसतील.तर तुम्हाला पुन्हा नवीन टेस्ट करायची गरज भासणार नाही.या मुले तुमच्या पैशाची देखील बचत होईल आणि वेळेची हि.
Abha Helth card information
आता पाहूया सर्वात महत्वाच म्हणजे आभा हेल्थ कार्ड नक्की कस बनवायचं ?
आभा हेल्थ कार्ड बनवण्यासाठी खूप उपाय आहेत.आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक आणि खाजगी दवाखाने.सामुदाईक अयोग्य केंद्र.प्राथमील आरोग्य केंद्र इथ जाऊन देखील बनउ शकता.
आभा हेल्थ कार्ड हे online कस काढायचं हे पहा :
हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा https://ndhm.gov.in/ असं सर्च करायचं आहे.
त्यानंतर ‘आयुष्यमान भारत डिजिटल मिशन’ योजनेची site तुम्हच्या समोर ओपन होईल.
पुठे तुम्हाला Create ABHA Number या रिकाम्यात क्लिक करायचं आहे.
याठिकाणी तुम्ही एकतर आपला आधार कार्ड व ड्राईविंग लायसन्स नंबर देऊन आपला आभा हेल्थ कार्ड काडू शकता.
जर तुम्ही आधार नंबर द्वारे आपले कार्ड काढत असाल तर हे लक्षात घ्या हि तुमचा आधार कार्ड नंबर हा तुमच्या मोबाईल नंबर शी जोडलेला असला पाहिजे.हि सूचना हि तेथे तुम्हाला दिसेल.पुठे next या बटनावर क्लिक करावे.
सुरुवातीला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे.दिलेल्या सूचना तुम्हाला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत.सहमत असाल तर रिकाम्या जागेत box मध्ये तुम्हाला टिक मार्क करायचा आहे.
पुठे खाली दिलेल्या प्रश्नांनी उतरे द्यायचे आहेत आणि next या बटनावर क्लिक करायचा आहे.
पुठे तुम्हाच्या मोबाईल वर एक otp सेंड करण्यात येईल .तो टाकून next बटनावर क्लिक करायचा आहे.
पुठे तुम्हाला एक new पेज ओपन होईल ज्या मध्ये तुम्हचे नाव ,पत्ता ,जन्म तारीख ,लिंग ,फोटो अशी सर्व माहिती दिसून येईल.Aadhar Authentication Successful झाल्याचीही सूचना तेथे देण्यात येईल.त्यानंतर पुठे next बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
पुठे तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल.त्या ठिकाणी तुम्हाला आधाराशी क्लिक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि पुठे next बटनावर क्लिक करायचा आहे.
तुम्ही तुमचा ई – मेल id हि आभा क्रमांकाशी जोडू शकता.त्याशिवाय जर तुम्हाला जोडायचा नसेल तर इथल्या skip for now या पर्यायावर क्लिक करा.Abha Helth card information in marathi
आता युम्हला स्क्रीन वर तुमचा आभा क्रमांक तयार झाल्याची सूचना दिसेल.त्या खाली तुम्हचा आभा नंबर नमूद केलेला असेल.आता इथल्या Link ABHA Address या रिकाम्यात क्लिक करायचं आहे.
पुठे तुम्हाला या आधी कधी तुम्ही आभा id तयार केलेला आहे का? असे विचारण्यात येईल. तुम्ही नो बटनावर क्लिक करून sign up for abha address रिकाम्यात क्लिक करायच आहे.
या ठिकाणी तुम्हाला तुमचे Profile Details दाखवले जातील.ते निट वाचून तुम्हाला Abha Address तयार करायचा आहे.
Abha Helth card
खालच्या रिकाम्यात तुम्ही तुमच नाव.जन्मतारीख यापैकी जे लक्षात राहील ते टाकून तुम्ही तुमचा आभा address तयार करू शकता.हे टाकून झाल कि तुम्हाला create and link या रिकाम्या box मध्ये टिक करायचा आहे.
पुठे तुम्हचा आभा नंबर आभा address बरोबर लिंक झाल्याचा मेसेज तुम्हाच्या मोबाईल वर येईल.आता तुम्हाला back च बटन दाबून बाहेर पडायचे आहे.
हे आभा कार्ड आपण download कस करायच हे पहा.
हे आभा कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला healthid.abdm.gov.in असं सर्च करायचं आहे.इथ लॉग इन करायचा आहे.
त्यासाठी तुम्ही आपला आधार नंबर किवा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता. आभा नंबर,जन्म वर्ष आणि तिथं दिलेलं गणित सोडवून Continue वर क्लिक करायच आहे.
त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमच आभा हेल्थ कार्ड दिसेल.इथल्या DOWNLOAD या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचे आभा हेल्थ कार्ड क्लिक करू शकता.
एवठच नव्हे तर तुम्ही तुम्हाच्या आभा कार्ड वरील EMAIL, फोन नंबर तसेच इतर माहितीही अपडेट करू शकता.तसेच ते delete किंवा deactivate देखील करू शकता.
कार्ड ची सुरक्षितता
आभा हेल्थ कार्ड चे तर फायदे आपण पाहिलेच असणार त्याशिवाय प्रयाव्हसी आणि सायबर सेक्युरिटीचा प्रश्न देखील निर्माण होईल.अशी चिंता सायबर तत्ज्ञाना वाटते.
या हेल्थ कार्ड मध्ये आपली सगळी माहिती हि डिजिटल ठेवली जाणार आहे.या महितिला एका सर्वरमध्ये ठेवले जाणार आहे.
खाजगी पद्धतीने सुरक्षित वातावरणात लोक त्यांचा डेटा सांभाळू शकतील.असा सरकारचा दावा आहे.
चला तर मग तुम्हाला आभा हेल्थ कार्ड {Abha Helth card information in marathi} या कार्ड विषय संपूर्ण माहिती समजली असेल.जर तुम्ही हे कार्ड काठले नसेल तर लवकरात लवकर हे कार्ड कडून घ्या.
जेणे करून त्याचे सर्व फायदे तुम्हाला घेता येतील.माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट box मध्ये सांगा आणि तुमच्या मित्रांना जरूर शेयर करा.अश्याच विविध सरकारी माहिती योजना साठी आपल्या ‘किनारा मराठीचा’ या वेबसाईट ला भेट देत रहा.