आई एकविरा देवस्थान /ekvira aai mandir information in marathi नमस्कार मित्रांनो किनारा मराठीचा या माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ज्या विषय माहिती पाहणार आहोत.
ती म्हणजे माझी आई एकविरा देवी आज मी हा लेख लिहिताना सुध्दा खूपच आनंदी आहे. कारण आज मी माझ्या आई विषय तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे. चला तर वेळ कशाला सुरू करूया…
आई एकविरा देवी हे नाव घेताच आपल्या मराठी माणसाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळतो. मग मनात येत ते कधी एकदा आईच्या दर्शनाला जायला मिळेल याची वाट.
नागमोडी वळणे, उंचच उंच धबधबे या सर्वांपासून वेगळं अनोखं म्हणजे आई माऊलीच मंदिर. या मंदिराचा आपण थोडीशी माहिती घेणार आहोत.
ekvira aai mandir information in marathi
एकविरा आई मंदिर हे लोणावळा खंडाळा घाटापासुन कार्ला लेणी मधील वहेरगाव येथे स्तिर आहे. प्रामुख्याने आई एकविरा देवीची पूजा आगरी – कोळी, आदिवासी समाज खुप मोठ्या प्रमाणात करत असतात.
तसेच इतर अनेक लोक या देवीची पूजा उपासना करताना दिसत असतात.
एकवीरा आई हि एक हिंदू देवता आहे.भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागात अमर ऋषी परशुरामाची आई म्हणुन एकविरा आईची रेणुका देवी म्हणुन पुजा, उपासना केली जाते.
एकविरा आईचे देऊळ :
एकविरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा येथील वहेरगाव येथे कार्ला बौध्द लेण्या जवळ स्थिर आहे.पहिला असता तेथे आगरी समाज, कोळी समाज, मराठा, आदिवासी समाज हे खुप मोठ्या संख्येने येथे उपस्थित असतात.
मग ते कोणताही मोसम असो.या वैतिरिक्त ब्राह्मण हि खुप मोठ्या संख्येने देवीची पूजा, उपासना करताना आपल्याला दिसतात. आगरी, कुणबी समाजाची ची कुलस्वामिनी कुलदेवी आहे.
या मंदिर संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधलेली मूळची तिन मंदिरे असुन ती सर्व पश्चमाभिमुख झाली आहेत. ‘ekvira aai mandir information in marathi ‘ यापैकी मधले आणि दक्षिणेकडील मंदिर पूर्णपने सुरकक्षित असुन इतर बांद कामे फक्त नावापुरती नकाशावर अस्तित्वात आहेत.
जर तुम्ही या वास्तूचा अभ्यास केला तर तुमच्या लक्ष्यात येईल. या तिन्ही देवळाच्या समोरचं महामंडप , वर्षमंडप आणि गोपुर आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हि तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिसरातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिराने वेडलेली आहेत.
ekvira aai mandir information
आई एकविरा देवीची दर वर्षी चैत्र पौर्णिमा, अश्विन नवरात्री आणि शारदीय नवरात्र या दिवशी मंदिरात पुजा व उत्सव साजरा केला जातो. या मंदिरात पशु बळी देण्याचा देखील रिवाज आहे.
बकरी आणि कोंबडी या सारख्या प्राण्याचे नवस येथे बोलले जातात. आई एकविरा माते कडे चमत्कारी शक्ति आहे असे सर्व मानतात .
आई एकविरा देवी बद्दल दंतकथा :
पौराणिक कथा नुसार हे मंदिर पाच पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात बांधले होते. एकदा हे पाच पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना अचानक त्यांच्या समोर एक प्रकाशमय उजेड झाला ते सर्व त्या प्रकाशाकडे पाहू लागले.
तर पाहतात की प्रत्यक्ष आई एकविरा आई त्यांच्या समोर उभी आहे. तेव्हा आईनी त्या पाच पांडवांना तिथे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण या आढेशामध्ये आई एकविरा देवी नी त्या पाच पांडवांना एका रात्रीत मंदिर बांधण्याचा आदेश दिला.
पाचपांड वांनी ही हे मंदिर एका रात्रीत बांधले. त्यांची ही भक्ती पाहून आई एकविरा देवी ने त्यांना वचन दिले की त्यांचा वनवास पुर्ण झाल्या वर त्यांना कोणीही एकवर्ष ओळखु शकणार नाहीत. असा वर तिने पांडवांना दिला.
एकविरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे. तथापि कार्बन डेटिंग नुसार असे आढळते की, या मंदिराची बांधणी 2 काळ खंडात झाली आहे.ekvira aai mandir information in marathi ते म्हणजे इ. स. वी. सन. पुर्वी दुसऱ्या कालखंडापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत व इ. स. सन 5 व्या शतकापासून ते 10 व्या शतकापर्यंत.
ekvira aai mandir
देविच स्थान : सदर मंदिर हे डोंगरावर आहे. डोंगरावर जाण्या साठी थोड्या पायऱ्या चढावे लागतात. एकविरा देवीचे मंदीर हे आसपासच्या बाजुला कोरलेले लेण्यांनी वेधले आहे.
मुख्य देवता आई एकविरा माता तर तिच्या डावी कडे जोगेश्वरी देवी आहे. टेकरीच्या अर्धा भागामध्ये देवींच्या पवित्र पायांसाठी एक पवित्र मंदीर आहे.
इथे यावे कसे : तर मित्रांनो जर तुमच्या मनात आई एकविरा देवीच्या चरणी येण्याची इच्छा असेल तर मी सांगतो की कसे यायचे. लोणावळा पासुन देवीच मंदिर हे साधारण 8 किलो. मीटर अंतरावर आहे.
तूम्ही लोणावळा वरुन ST महामंडळाच्या बसेस मधून जाऊ शकता. किंवा रिक्षा,eco द्वारे पण आईच्या दर्शनाला जाऊ शकता…
चला तर मित्रांनो मी हा लेख इथेच संपवतो. मात्र तुम्हाला माझ्या “ekvira aai mandir information in marathi “ लाडक्या आईची माहिती कशी वाटली नक्की सांगा. मात्र एकदा तरी आईच्या दर्शनाला जायला विसरू नका….. धन्यवाद.