Hanuman Jayanti information in marathi – हनुमान जयंती हि पूर्ण भारतात मोठ्या आनंदात साजरी
करण्यात येते.खास करून महाराष्ट्र मध्ये हा दिवस खूप मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येतो. या दिवशी हनुमान मंदिरात
सुर्यादया पासून ते सूर्यास्त होई पर्यत देवळात भजनी मंडळी भजन करत असतात.संद्याकाळी पूर्ण गावात बजरंग बळी ची पालखी मिरवणूक काडली जाते .भारतीय सांस्कृतिक हा दिवस खूप महत्वाचा मनाला जातो.
आज आपण या लेखमध्ये हनुमान जयंती नक्की का साजरी करण्यात येते याची संपूर्ण महिती पाहणार आहोत.चला तर मग हनुमान जयंती विषय थोडक्यात माहिती पाहूया.
Hanuman Jayanti information in marathi
हनुमान जयंती हा दिवस म्हणजे हिंदू देवता हनुमान याचा
जन्म दिवस.याच दिवशी महाबलवान, पवन पुत्र हनुमान
जन्माला आले.
दर वर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी हनुमान
जयंती हि साजरी करण्यात येते.
( Hanuman Jayanti information in marathi )या दिवशी
हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षौडशोपचार पूजेला तशेच कीर्तनाला
प्रारंभ करतात.सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला असे पुराणात सांगण्यात येतो.
हनुमानाचा जन्म
हा नाशिक जिल्यातील अंजिनेरी येते झाला असे मानण्यात येते. वानर गणांचा राजा केसरी आणि त्यांची पत्नी अंजना यांचा हनुमान हा
पुत्र आहे .
पूजा पद्धती
महाराष्ट्रात सामन्यपणे शनिवारी, तर उर्वरित भारतात
शनिवारी आणि मंगळवार हे मारुतीचे वार समजले जातात.
या दिवशी मारुतिला
शेंदूर,तेल,तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे.तसेच मंदिरात नारळ
फोडण्याची प्रथा हि फार पूर्वी पासून चालत आलेली प्रथा आहे.
उत्तर भारतात
सुद्धा हनुमानाची उपासना प्रशिद्ध आहे.तुळशीदास यांनी लिहिलेला हनुमान चालीसा
उत्तर भारतात खूप प्रशिद्ध तसेच विशेस लोकप्रिय आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात १७ व्या शतकात
स्वराज्य स्थापनेसाठी महाराष्ट्रात हनुमानची उपासना घर घरात पोहचवली.
त्या साठी
त्यांनी ११ ठिकाणी विविध हनुमान मंदिरे स्थापन केली. जी आज आपण ११ मारुती म्हणून
त्यांची पूजा करतो.
महाराष्ट्रात श्री स्वामी यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे
मारुती स्तोत्र महाराष्ट्रात उपासनेचे मुख्य स्तोत्र मानले जाते.
Hanuman Jayanti information
हनुमान हा सूर्याला फळ समजून खाण्याची प्रचलित कथा …
हनुमान हा लहान असतांना सूर्याला फळ समजून खाण्यासाठी त्याने आकाशात झेप गेतली .तेव्हा हनुमान आणि इंद्र देव तसेच अनेक देव गण यांच्यात युध्य झाले.
त्या वेळी हनुमान ला दुखापती करण्यात आली.हे पाहून पवन देवाने पूर्ण पृथ्वी तलावावरीर वायू आपल्या शक्तीने बंद करून टाकली.
या सर्व कारणांमुळे पृथ्वी वर हाहा कार सुरु झाला …हे सर्व पाहून सर्व देवलोकात हाहा कार झाला.
पवन देवा समोर हार मानून या सर्व देवांनी हनुमानला महाशक्ती शाली असे अनेक वचन दिले.अशी कथा हनुमांच्या बाबतीत प्रशिद्ध आहे.{Hanuman Jayanti information in marathi
महाराष्ट्रात प्रामुख्याने संत रामदास स्वामी समर्थ याचे श्री हनुमान चालीसा श्रोत चे वाचन हे केले जाते …संत राम दास स्वामी यांनी लिहिलेले हनुमान चालीसा पहा…..
भीमरूपी महारुद्रा,वज्र हनुमान मारुती |
वनारी अंजनीसुता,रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता,सकळा उठवी बळे |
सौख्यहारी शोकहर्ता,धूर्त वैष्णव गायका ||२||
दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा |
पातळ दैवता हंता,भव्य सिंदुर लेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा,प्राणनाथा पुराथाना |
पुण्यवंता पुण्याशिला,पावना परितोषका ||४||
ध्वजांगे उचळी बाहू, आवेशे लोटिला पुठे |
कालाग्नी काळरुद्रग्नी, देखता कापती भले ||५||
ब्रह्मांड माईळा नेणो,आवळे दंतपंगती |
नेत्राग्नी चालिल्या ज्वाला,भृकुटी त्राहिटील्या बळे ||६||
पुच्छ ते मुरडिले माथा,किरीटी कुंडले बरी |
सुवर्णकटीकासोटी,घंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा,नेटका सडपातळू |
चपलांग पाहता मोठे,महा विद्दुलतेपरी ||८||
कोटीच्या कोटी उड्डाणे,झेपावे उत्तरेकडे |
मन्द्राद्री सारिखा द्रोनु,क्रोधे उत्पातिला बळे ||९||
आणीत मागुता नेला,गेला आला मनोगती |
मनासी टाकिले मागे,गतीस तुलना नसे ||१०||
अनुपासुनी ब्रह्मांड,येवढा होत जा तसे |
तयासी तुलना कोठे मेरुमंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवती वेढे वज्रपुच्छ घालू शके |
तयासी तुलना कैसी,ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिले डोळा,गिळिले सूर्य मंडळा |
वाढता वाढता वाढे,भेदिले शून्य मंडळा ||१३||
धनधान्यपशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही |
पावती रूप विद्यादि,स्त्रोत पाठे करुनिया ||१४||
भूतप्रेत समंंधादि, रोगव्याधी समस्तही |
नासती तुटती चिंता,आनंदे भिमदर्शेने ||१५||
हे धरा पंधराश्लोकी,लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो,संख्या चंद्रकाळागुने ||१६||
रामदासी अग्रगण्यू,कपिकुळासी मंडण |
रामरुपी अंतरात्मा दर्शने दोष नासती ||१७||
|| इति श्रीरामदासकृत संकट निरसन मारुतीस्तोत्रंं संपूर्णम् ||
अश्या प्रकारे आपण संतरामादास स्वामी यांनी लेहिलेल्या मारुती स्रोत बद्दल माहिती पहिली.आता पहा या स्रोताचे जप पद्धत कशी आहे ते …
मारुती स्रोत याचे वाचन सकाळी अथवा संध्याकाळी करावे.या साठी आधी स्वताला शुद्ध करावे आणि नंतर हनुमानच्या मंदिरात जाऊन बसावे.सर्वात महत्वाचे म्हणजे या स्रोत्चे पठाण करताना आपले मं हे एकाग्य असायला हवे.
सांगण्यात येते कि जर तुम्हाला फळ प्राप्ती ची इच्छा असेल तर ११०० वेळा या स्रोताचे पठाण करावे.त्याने तुम्हाच्या आयुष्यात नक्की तुम्हाला फळाची प्राप्ती होईल.
त्याचप्रमाणे पठाण करण्यार्या व्यक्तीने मास खाऊ नये तसेच तंबाखू ,सिगारेट,दारू या सारख्या गोष्टींचे शेवन करू नये.
अशा प्रकारे आपण आज हनुमान जयंती विषय थोडक्यात माहिती
पाहिली. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा ….अश्याच नवनवीन माहिती साठी
माझ्या किनारा मराठीचा. com या साईट ला भेट द्यायला विसरू नका.