Murbad mhasa yatra mahiti 2023/मुरबाडची म्हसा यात्रा संपूर्ण माहिती पहा

Murbad Mhasa Yatra Mahiti 2023 – मित्रांनो आपल्या महाराष्ट्र भूमी वर अनेक ठिकाणी या, छोट्या मोठ्या जत्रा भरल्या जातात.या लेखात आपण आपल्या महाराष्ट्रातील मुरबाड शहरातील म्हसा या गावातील म्हसा यात्रेची माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.चला तर मग सुरु करूया.मित्रांनो म्हसा हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील नाणेघाट मार्गातील एक प्राचीन गाव आहे.

या ठिकाणी शंकराचे एक प्राचीन मंदिर स्थित आहे.या मंदिरातील शंकराच्या मूर्तीला म्हसोबा असे आपल्या महाराष्ट्रातील शिव भक्त मानतात.या म्हसोबा नावावरूनच या गावाचे म्हसा हे नाव ठेवण्यात आलेले आहे. (Murbad Mhasa Yatra Mahiti 2023)सर्वात महत्वाचे म्हणजे हे मंदिर प्राचीन काळी बांधण्यात आलेला आहे.

मित्रांनो या ठिकाणी दर वर्षी आपल्या म्हसोबाची जत्रा हि भरवण्यात येत असते.हि जत्रा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रा पैकी एक आहे. हे म्हसोबाचे देवस्थान एक जागृत देवस्थान आहे. असे येथील स्थानिक भाविकांचे मत आहे…. या ठिकाणी लोक अनेक नवस घेऊन येत असतात. या यात्रेला आपल्या महाराष्ट्रातील लोक तसेच गुजरात,तामिळनाडू,कर्नाटका,UP,बिहार,अश्या संपूर्ण राज्यातील व्यापारी आपले माल विकण्यासाठी साठी येत असतात.

दर वर्षी पौष पौर्णिमेला या यात्रेला ला सुरुवात हि होत असते.त्या नंतर सुणारे १५ दिवस हि यात्रा या गावात साजरी केली जाते.येथील स्थानिक लोकांसाठी हि यात्रा एक प्रकारे दीपावली च्या सना सन्मान आहे.हे यात्रेचे पंधरा दिवस येथील लोक तसेच या ठिकाणी येणारे भाविक अगदी आनंदाने या यात्रेची मजा घेताना आपल्याला दिसतीत.

Murbad Mhasa Yatra Mahiti 2023-MHASA YATRA HISTORY

मित्रांनो,आता जरा एक नजर या म्हसा गावावर त्याच्या म्हसा यात्रेवर टाकूया.मित्रांनो तेथील स्थानिक पूर्वच सांगतात कि म्हसा हि यात्रा सुमारे  २५० वर्षा पासून या ठिकाणी भवली जात आहे.या पूर्वी देखील या ठिकाणी संपूर्ण भारतातील जनता या यात्रेला हजेरी लावत असत.असेच भारतातील जनता च नव्हे तर देशाबाहेरिल प्रदेशातील लोक या ठिकाणी येत असत.या ठिकाणी इंग्रजापासून ते मुघालापर्यंत जनता हि येऊन गेलीली आहे.या पूर्वी हि यात्रा एक व्यापार म्हणून भरत असत.

तर हि यात्रा फक्त १५ दिवस नव्हे, तर कमीत कमी 1 महिना तर 1.5 महिना भारत असत.या ठिकाणी अनेक व्यापारी हे आपल्या कच्चा मालाची विक्री तसेच पक्या मालाची विक्री करण्यासाठी येत असत.या 1 महिन्यात या ठिकाणी वेगवेगले कार्यक्रम राबवले जात असत.मुख्यता हि यात्रा बैल बाजारा साठी खूप मोठ्या प्रमावर ओळखली जायची आताही या यात्रेची सर्वात आकर्षक बाब म्हणजे बैल बाजार.या यात्रेमध्ये बैल,गाय,म्हैस,या सारख्या जनावरांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत असत.आजही हि विक्री या बाजारात होत असते.

मित्रांनो येथील स्थानिक लोक सांगतात कि या यात्रेला 1 महिना संपूर्ण खूप आनंदाने लोक हि या यात्रेची मजा घेत असत.रात्री दूरवरून आलेले तामाष्याचे फड ,लावणी चे कार्यक्रम,संपूर्ण महिना भर लागत असत.त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी पाळणे,रेल गाडी ,झोके या सारखे खेळणी लावण्यात येत असत.दूर दुरून यात्रेकरू हे तमाश्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत असत.मित्रांनो या ठिकाणी जवळजवळ २०० ते २५० एकर मध्ये जमिनीवर गुरांची राग हि उभी असते.{Murbad Mhasa Yatra Mahiti 2023}

तर महाराष्ट्र शिवाय कर्नाटका ,गुजरात या राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर वर्षी गुरे खरेदीसाठी येथे येतात.तर हि गुरांची विक्री पौष वद्य प्रतिपदेला विक्री करण्यास सुरुवात हि करण्यात येत असते.यात्रेमध्ये कपडे ,मिठाई,खेळणी,ब्लंकेत ,घोंगड्या,सोलापुरी चादर,मेसुर,खाजा,पेठे,या सर्व व्यापाराची दुकाने खूप मोठ्या प्रमाणावर असतात.तर हि यात्रा थंडीच्या दिवसात भारत असल्याने या यात्रेमध्ये घोंगड्या,ब्लंकेट,स्वेटर,चादरीची मोठ्या प्रमाणात दुकाने हि आपल्याला पाहायला मिळतात.तर या यात्रेच्या काळात या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे स्टोल्स,सर्कस,मौत का कुव,जायंट व्हील,फुगेवाले,तमाष्याचे फड या सारखे मनोरंजनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला आपल्या मिळत असत.

MHASA YA THIKANI JANECHE MARG

मित्रांनो जर तुम्ही या यात्रेचा विचार मनात करत असाल.तुम्हाला सांगू इच्छितो हि यात्रा म्हणजे एक अतिशय सुंदर अस हे एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे.मित्रांनो. या ठिकाणी जाण्यासाठी जर तुम्ही माळशेज घाट मार्गे येत असाल तर सरळगाव वरून मुरबाड वरून तुमी १५  किलोमीटर अंतरावर म्हसा हे देवसस्थान आहे. तर मुंबई करांसाठी साठी सरळ cst पासून कल्याण तर कल्याण पासून मुरबाड व मुरबाड पासून तुम्हाला कालीपिली किंवा बस सेवा उपलब्द आहेत मित्रांनो.याशिवाय जर तुम्ही कर्जत वरून येत असाल तर कर्जत पासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर बसेस च्या सहायाने तुम्ही म्हसा या ठिकाणी येऊ शकता.

हे पण वाचा – :

मुळगावचे खंडोबा मंदिर – : वाचा

आई एकविरा मंदिर कार्ला – : वाचा

मित्रांनो जर तुम्ही बदलापूर मार्गे म्हसा यात्रेला येण्याचा प्रयत्न करत करत असाल.तर बदलापूर वरून तुम्हाला मुरबाड हि बस पकडावी लागेल त्यानंतर मुरबाड वरून म्हसा यात्रेसाठी बस सेवा उपलब्ध शासनाने करून दिल्या आहेत.

हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तसेच जर तुम्ही या ठिकाणी कधी गेला नसाल तर नक्की एकदा तरी जाऊन या हे ठिकाण म्हणजे शंकर महादेवाच खाम्बेस्वर मंदिर आहे. या ठिकाणी नक्कीच तुन्हाला एक शांत असा मनाचा विसावा मिळेल.माहिती कशी वाटली नक्की सांगा तर या यात्रे संबंधी जर तुमच्या मनात प्रश्न येत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो…धन्यवाद

FAQ

  1. म्हसा यात्रा कधी सुरु होते ?

उत्तर – : म्हसा यात्रा हि पौष पौर्णिमेला भरवण्यात येते,इंग्रजी महिन्यात जर आपण पाहिले तर डिसेंबर -जानेवारी महिन्यादरम्यान हि यात्रा भरते.

2. या यात्रे मध्ये प्रामुख्याने कश्याची विक्री होते ?

उत्तर – : या यात्रे मध्ये प्रामुख्याने बैल,गाय,म्हैस या गुरांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.त्याचप्रमाणे ब्लाकेट,घोंगडी,सोलापूर चादर यांची मोठ्या प्रमाणात विक्री हि केली जाते.

3) म्हसा या ठिकाणी कोणाचे मंदिर आहे ?

उत्तर – : म्हसा या ठिकाणी श्री शंकराचे महादेवाचे मंदिर आहे.या मंदिराला खाम्बेस्वर मंदिर असेही म्हणतात.

Leave a comment