नाणेघाट – महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग / Naneghat information in marathi

नाणेघाट – महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग / Naneghat information in marathi – नमस्कार मित्रानो ,पुन्हा एकदा माझ्या “किनारा मराठीचा .com” या site वर तुमचं स्वागत आहे.पावसाला आला कि सर्वांना ओढ लागते,ती अनेक, मोठ-मोठ्या धबधब्यावर मनमोकळे पणाने फिरायला जायची. आज आपण महाराष्ट्रच्या कुशीत वसलेले “नाणेघाट” या सुंदर स्थळा बद्दल माहिती पाहणार आहोत.चला तर मग वेळ न घालवता.या नाणेघाटा बद्दल माहिती पाहू या ….

Naneghat information in marathi
Naneghat information in marathi

Naneghat information in marathi

 महाराष्ट्रातील प्राचीन पुरात्त्वीय अवशेष्याचे एक मानले जाणारे प्राचीनकाळी स्थळ म्हणजे “नाणेघाट”.हे ठिकाण पुणे  आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जुन्नर तालुक्याच्या वायव्य भागामध्ये सुमारे २८ किमी.अंतरामध्ये पसलेले आहे.
आपल्या माहिती साठी हा संपूर्ण सुमारे 5 किमी लाबं तर ८६० मी.उंच आहे.प्राचीन काळात पश्चिम आशियातून येणारा व्यापार हा मुंबईच्या उत्तरेस असलेल्या भांडोच (भरूकचछ ),सोपरा त्याचप्रमाणे कल्याण – चेऊल या बंदरामध्ये येत असत.या बंदरापैकी सोपारा या ठिकाणी येणारे व्यापारी हे मालाची विभागणीची वाहतूक नाणेघाट खिर्डीमार्गे देशावर होत असे,
त्याचप्रमाणे देश्यात येणारे व्यापारी ,यात्री हे या कोकण मार्गाने ये – जा करत असत.सोपारा व कल्याण या ठिकाणी येण्यासाठी नाणेघाट हा सर्वात जवळचा मार्ग त्या काळी होता.(Naneghat information in marathi) कारण  नाणेघाटपासून  जुन्नर-नगर-नेवास तसेच पैठण हा असा हा मार्ग आहे.
नाणेघाट हा कोकणाला व देशाला जोडणारा एक प्रकारचा दुवा आहे.घाटमाथ्यावर पठार असून त्या  ठिकाणी भव्य असा कोरीव एक दगडी रांजण आहे.मानण्यात येते कि पूर्वी या राजानामध्ये जकातीची रक्कम जमा केली जात असे.
नाणेघाटाच्या भूक्षेत्राचे राजकीय स्थान तसेच तसेच शेजारील जुन्नर या दोन्ही प्राचीन स्थानाशी असलेला यांच्यातील एक जवळचा संबंध आहे.आजही प्राचीन काळातील एक महत्वाचा व्यापारी केंद्र म्हणून जुन्नरचे अस्थित्त्व दिसून येते.
नाणेघाट येथील,खिंडमार्गात, मुख्य लेण्यात सातवाहन वंशातील राजांचे व त्यांच्या नातेवाईकांचे भग्न झालेले प्रतिमांचे अवशेष आहेत.
या प्रतिमांच्या वरील बाजूस त्यांची नावे देखील कोरलेली आहेतया ठिकाणी सातवाहन राणी नागनिका हिने केलेल्या वैदिक यज्ञांचा व दानाचा प्रदीर्घ शिलालेख दोन भिंतींवर कोरला आहे.
यामधील बरीच अक्षरे हि नष्ट झाल्याचे दिसून येते.तरी देखील त्यातील अवशिस्ट मजकुरावरून तत्कालीन सामाजिक,आर्थिक,धार्मिक तसेच राजकीय परिस्थितीवर बराच प्रकाश पडतो.
या मधील मुख्य लेण्यांच्या मंडपात दिन बाजूस बाके कोरलेली असून मंडपाच्या डाव्या आणि उजव्या भिंतीवर शिलालेख कोलालेला आपल्याला दिसेल.
तसेच मागील भिंतीवर सातवाहन राजवंशातील सात व्यक्तींच्या प्रतिमा कोरलेल्या आपल्याला दिसून येतील.या सर्वांची नावे पुठील प्रमाणे आहेत.
  • सिमुख सातवाहन
  • देवी नागनिका
  • श्रीसाताकर्णी
  • कुमार भाय
  • महारठी त्रनकयिर
  • कुमार हकुश्री
  • कुमार सातवाहन

Naneghat

या पैकी एका जोडपुताल्यांच्या वरच्या बाजूस देवी नागनिका आणि श्रीसातकर्णी  हा लेख आहे.  या वरून टी साताकर्नीची ती राणी असावी असे समजेले जाते.

त्याचाप्रमाने महारठी त्रनकयिर हा नागनिकेचा पिता असावा असे मानण्यात येते.
तर शेवटची दोन नाव्हे हे कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन हे सातकर्णी व नागनिकांचे लहान पुत्र त्याचप्रमाणे लेणे सातवाहन राजवंशाचे प्रतीमागृह असावे,अशा प्रकारचे पुरातत्वशास्त्र लोकांचे मत आहे.
या नाणेघाटात लेण्यात कोरलेला नागनिकेचा वर उल्लेखिलेला ब्रामी लिपीत असून प्राकृत या भाषेत आहे.
शिलालेखाच्या अक्षर वातीकेवरून या शीलालेखाचा काळ हा साधारण योहान ब्युरल,मिराशी यांसारख्या पुराभिलेखविध्यावन्तांच्या मते साधारण इ .स.पु .दुसरे -पहिले शतक असावे असा  पुरातत्वशास्त्र यांचे मत आहे.
सध्या अस्तितवात असलेला शिलालेख वीस ओळींचा असून डाव्या भिंतीवर शिलालेखाच्या दहा ओव्या कोरल्या आहेत.तसेच इतर दहा ओळी या उजव्या भिंतीवर कोरल्या आहेत.
WH साईक्स यांनी या सर्व प्रकारच्या शिलालेखाचा उल्लेख हा १८३७ च्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामध्ये केला.
पुठे जेम्स प्रिन्सेस,रेव्हारंड जॉन स्टीव्हनस,भागावान्लाल इंद्रजी,ब्युलर,मिराशी,अजयमित्र शाश्री ,शोभना गोखले,या सर्व लोकांनी शिलालेखाचे वाचन करून असलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.[Naneghat information in marathi]
 
 
अंगियकुलवर्धन वंशातील त्रनकयीरनामक महार्ठींची कन्या नागनिका हि सातवाहन राजा पहिला याची पत्नी तसेच राणी वेदिश्री राजाची व श्रीमान सती (शक्ती ) हि यांची माता होती.
सांगण्यात येते कि पतीच्या निधनानंतर नागनिकेने सातवाहन सामराज्याची धुरा आपल्या आही घेतली.
महाराणी नागनिकेला ज्या विशेषज्ञानी संबोधले आहे.त्यावरून हे समजते कि राणी हि वैराग्याचे जीवन जगत होती. हे यावरून शिद्ध होते.
या ल्रेखाच्या सुरुवातीला प्रजापती,धर्म,इंद्र,वासुदेव,चंद्र,सूर्य,कुमार,संकर्षण,आणि चार दिकपाळ-,यम , वरून,कुबेर,या सर्वांना अभिवादन केले आहे.या सर्व शीला लेखात नागनिकेने राजाबरोबर केलेले आणिक श्रोत यज्ञांचा उल्लेख आहे.
 
नाणेघाट – महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग
उदा ..दोन अश्वमेध व एक राजसूयतसे अग्न्योधय,अनारमभनीय,गवामयन,भगलदशरात्र,
आप्तोर्याम,अंगिरसम्यान,गर्गत्रिरात्र,अन्गीर्सारीत्रे,शतात्रीरात्र या सर्वांचा निरदेश आहे.
या व्यतिरिक्त  या अनेक यज्ञांचा उल्लेखावरून तत्कालीन धार्मिक स्थितीत यज्ञसंस्थेत महत्व दिसून येते.या सर्व यज्ञांच्या नामनिर्देशन बरोबर लेखात ब्राम्हनांना दिलेल्या हजारो गाई,हत्ती,घोडे,रथ,कार्षाषण नाणी,सोन्या चांदीचे अलंकार,इत्यान्दींचा उल्लेख मिळतो.
यावरून तत्कालीन आर्थिक आणि सांकृतीवर परिणाम पडतो.तसेच या शीला लेखात कार्षापण आणि प्रसर्पक या नाण्यांचा असलेला उल्लेख प्राचीन नानसशात्र अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
या व्यतिरिक्त या शिलालेखात आकड्याची वुपुल प्रमाणात उल्लेख केलेला मिळेल.यावरुन या काळात देखील जनता खूप प्रगत होती.{Naneghat information in marathi}
या मार्गाने येजा जे लोक करत असतात त्यांना सातवाहन साम्राजाची त्यांनी केलेल्या धार्मिक कार्याची व सातवाहनाच्या समृद्धीचे ओळख मिळते.असा हा शीला लेख उदेश हा असावा हे  पुरातत्वशास्त्र यांना वाटते.
नानेघाटापासून पासून सुमारे २८ किमी.अंतरावर असलेल्या जुन्नर या गावी नाणकशाश्रज्ञ पी.जे.चीन्मूळगुंद यांना इ.स.१९७६ मध्ये सातकर्णी आणि नागनिका यांचे चांदीचे संयुक्त नाणे एक शेतकऱ्याकडून मिळाले होते.त्या वर ब्रामनी लेखात नागनिका आणि सिरी सातकनी असा उल्लेख आहे.
त्याशिवाय नानेघातातून कोकणाकडे जनाच्या मार्गावर,काही अंतरावर असलेल्या एका पाण्याच्या टाक्यावर असलेला सातवाहन राजा वसिष्टपुत्र स्कंद सातकर्नीचा शिलालेख भगवानलाल इंद्रजी यांनी प्रकाशित केला आहे.या दोन्ही गोस्ठींचा उल्लेख नाणेघाटाच्या संदर्भात खूप महत्वाचा आहे.
आपल्या भारतीय पुरातत्त्व खात्याने तर या ठिकाणाला राष्ट्रीय महत्त्वाचे स्थळ म्हणून घोषित केले आहे.
आपण या लेखात नाणे घाट या जागे बद्दल माहिती पाहिली. माहिती कशी वाटली नक्की सांगा मित्रांनो ..आपल्या मित्रांना जरूर शेयर करा. जर तुम्ही या ठिकाणी गेला नसाल तर नक्की जा ….धन्यवाद ..

Leave a comment