navratri information in marathi- आपल्या भारतात अनेक सन हे अगदी आनंदाने साजरे केले जातात.त्यामध्ये श्रावण महिना चालू झाला कि सणाची जणू काही जत्राच सुरु झाली आहे अस म्हणाला वाटत.भाद्रपदा मध्ये गणपती देवाचे आगमन झाल्या नंतर मनाला आस लागते ती म्हणजे आई दुर्गा च्या आगमनाची नवरात्र उत्सवाची शारदीय नवरात्रीची. navratri information in marathi कारण आपल्या कडे प्रत्येक सन हा अगदी उत्साहाने साजरे केले जातात.वर्षभरात नवरात्री हि आपल्या कडे तीन वेळा साजरी करण्यात येते.त्यामध्ये शारदीय नवरात्रीचे महत्व आपल्या साठी अनन्य आहे.आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत चार महिने अर्थात चातुर्मासात आपल्याकडे अनेक व्रत आणि सन हे साजरे होत असतात.अश्विन शुध्द प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपल्याकडे शारदीय नवरात्र उत्सव हा साजरा करण्यात येतो.त्याचप्रमाणे या वर्षी देखील नवरात्र उत्सव हा सुरु होत आहे. तो म्हणजे 03 ऑक्टोंबर 2024 ते 12 ऑक्टोबर 2024 (या दिवसी विजया दशमी हा सन आहे). या दिवसी नव दिवस देवीची पूजा हि करण्यात येत असते.तर काही स्त्रिया या या नव दिवस अगदी श्रद्धेने उपवास धरत असतात.त्या शिवाय या नव देवसात देवीच्या नावाने नव रंगाचे वस्त्र देवीला दिले जातात.तिला सजवले जातात.तर लोक हि आपल्या अंगावर नव दिवस नव रंगाचे कपडे घातले जातात.या दिवसाचे नक्की महत्व नक्की काय आणि तसेच नवरात्र काही पासून साजरी करण्यात येऊ लागली या सर्व प्रश्नाची माहिती हि आपण पाहणार आहोत. नक्की वाचा ….चला तर मग पाहूया…
नवरात्रीच्या पहिल्या दिवसी प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कुल देवाची उपासना म्हणून नवरात्रीचे नव दिवस आपल्या देवाची पूजा करतात.आपल्या देवासमोर देवाचे घट बसवण्यात येतात.पहिल्या तीन दिवसात दुर्गेची पूजा करण्यात येते.ऊर्जा आणि शक्तीची देवता म्हणून दुर्गेची पूजा या दिवसात करण्यात येते.फळ,फुल आणि आरती ,भजन स्वरुपात हि पूजा करण्यात येते.यामध्ये कुमारिका पूजन,पार्वती पूजन,सरस्वती पूजन आणि काळी पूजनही करण्यात येते.अश्विन शुध्द प्रतिपदा ते दशमी असे देवीचे नवरात्र साजरे केले जाते.प्रतिपदेस या दिवशी देवीचा घट बसवितात.देवघरा समोर एक पत्रावळ घेऊन त्यावर काळ्या मातीचा ढिक करतात. त्यावर पाच प्रकारचे धान्य टाकतात,यावर मातीचा घट बसवितात.(navratri information in marathi) या घटास कडेने नागिणीची पाच पाने बांधतात.त्याच्या तोंडाला पाच पाने आंब्याची कडेने लावतात.घाटात पाणी,नाणे व हळकुंड टाकतात.अश्या पद्धतीने घट स्थापना करून त्यावर फुलांची माळ सोडतात.नव दिवस एक नविन फुलांची माळ हि सोडली जाते.त्यात प्रामुख्याने विड्याच्या पानाच्या तसेच तरवड या झाडाची फुले व पानाच्या माळा वाहिल्या जातात.देवघरात तेलाचा दिवा लावतात तो दिवा कोजागिरी पोर्णिमेपर्यंत तेवत अखंड तेवत ठेवतात.नऊ दिवस उपवास धरतात.तर कोणी पहिल्या दिवसी व घट उठवण्याच्या आदल्या दिवसी उपवास करतात.पंचमीला ललिता पंचमी म्हणतात.पंचमीस घटावर सायंकाळी कडकनी,करंज्या,गोड वडे, पीठा पासून बनवलेले करंडा,फनी व खोबर्याची वाटी वैगेरे टांगतात. तर काही ठिकाणी या वस्तू अष्टमी पर्यंत टांगवल्या जातात.
विविध खेळ फुगड्या,फेर रात्री खेळले जातात.या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानाचे तोरणे बांधतात.सर्वजण नवरात्र जागऊन देवीची आराधना,प्राथना करतात.अष्टमीचे दिवसी पूजा आणि होम करण्यात येतात.तर रात्री देवीची पूजा झाल्यानंतर सुवासनी घागरी फुंकून नाचतात.नवमीला शत्रपूजन होते.दशमी दिवसी म्हणजे विजया दशमीला देवीला पुरणपोळ्याचे नैवैद्य दाखऊन घाटाचे माळा उतरून घटावर उगविले धान देवास वाहून घटाचे उत्थापन करून उपवासाची सांगता करतात.
वर्षभरात आपल्याकडे चार नवरात्री साजऱ्या करण्यात येतात.तर त्यापैकी दोन गुप्त नवरात्री असून चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात
करण्यात येते.शारदीय नवरात्रीचे विषेश महत्व आहे.देवीचे नामस्मरण करणे,उपासना करणे आणि जप करणे या सर्व गोष्टी साठी हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आल्या आहेत.असुरी शक्तींचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी चांगला कालावधी मानण्यात येतो.शरद ऋतूच्या सुरुवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळेच या उत्सवाला शारदीय नवरात्री उत्सव असे म्हटले जाते.अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यात.सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पिक पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता.त्यामुळे अनेक शेतकरी हा उत्सव अगदी आनंदाने हा उत्सव साजरा करतात.पण नंतर या सणाला धार्मिक महत्व प्राप्त झाले आणि हा उपासनेचा एक उत्सव झाला आहे.तर या काळात आपल्या महाराष्ट्रात असलेले देवीची शक्तिपीठे यांची हि पूजा,उत्सव अगदी आनंदाने साजरी करण्यात येऊ लागले.तर या काळात या शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी लोक खूप मोठ्या लोकसंखेने जातात.हा उत्सव आई दुर्गा मातेला समर्पित आहे.तर संस्कृत मध्ये नऊ रात्र रात्री असा याचा अर्थ होतो.नऊ दिवस क्रमाने 9 वेगवेगळ्या देवींची पूजाअर्चा करण्यात येते.तर दहाव्या दिवसी रावणाला दहन करून अर्थात विजया दशमी म्हणून हा सन साजरा करण्यात येतो.तर दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानण्यात आल्याने या दिवसाना अनन्यसाधारण महत्व आहे.
शारदीय नवरात्रीच्या दिवसी नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ देवींच्या रुपाची पूजाअर्चाना करण्यात येते. पहिल्या दिवसी शैलपुत्री देवी,तर दुसरा दिवस असतो तो ब्राम्हचारणी देवीची,तिसरा दिवस चंद्रघंटा देवीची पूजा करण्यात येते.चौथा दिवस कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते.पाचवा दिवस स्कंदमाता देवी,सहाव्या दिवसी कात्यायनी देवीची पूजा,सातवा दिवस हा कालरात्री देवीसाठी मानण्यात येतो.आठव्या दिवसी महागौरी देवी आणि नववा दिवस हा सिद्धीदात्री देवीच्या पूजनाचा दिवस मनाला जातो.पहिल्या दिवसी घटस्थापना करून विधीनुसार पूजा करण्यात येते.
मित्रांनो नवरात्री नक्की कश्या प्रकारे साजरी करण्यात येऊ लागली याच्या दोन पौराणिक कथा आहेत.तर पहिल्या पौराणिक कथे प्रमाणे महिषासुर नावाचा दैत्य राक्षस ब्रम्हदेवाचा भक्त होता.त्याने ब्रम्हदेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून एक वरदान मागितले.पृथ्वीवर राहणारा कोणताही माणूस अथवा देव अथवा दानव यापैकी आपल्याला मारू शकणार नाही.असे वरदान त्याला ब्रम्ह देवाने दिले.[navratri information in marathi] पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुर माजला आणि त्याने पृथ्वी,स्वर्ग आणि पातालावर हाहा कार माजवायला त्याने सुरुवात केली.त्याची दहशत सर्वत्र पसरू लागली.त्याचा वध करण्यासाठी ब्रम्ह,विष्णु आणि महेश यांनी माता दुर्गा देवी कडे मदत मागितली.मग नऊ दिवस दुर्गा देवीने महिषासुराशी युद्ध करून दहाव्या दिवसी महिषासुराचा वध केला.त्या मुलेच तिला महिषासुर मर्दिनी या नावाने देखील ओळखतात.या नंतर वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते.नऊ दिवस देवीने दिलेला लढा आणि वाईट गोष्टींचा नाश व्हावा यासाठीच नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरु झाली असे पुराणात सांगितले जाते.
हे पण नक्की वाचा :- पितृपक्ष मराठी माहिती
दुसऱ्या पौराणिक कथेप्रमाणे,श्री राम यांनी रावणाशी युध्द करण्यापूर्वी आणि आपल्याला विजय मिळावा या साठी भगवती देवीची आराधना केली होती.नऊ दिवस देवीची पूजा,आराधना आणि नामस्मरून करून देवीला प्रसन्न करून घेतले होते.त्या नंतर देवीने श्री रामाला लंका विजय चा आशिर्वाद दिला असे पूर्वज सांगतात. त्यानंतर दहाव्या दिवसी रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला.
सामान्यतः पडलेले प्रश्न :-
- नवरात्रीचे व्रत म्हणजे काय ?
उत्तर :- हा एक उपवास कालावधी असतो.यामध्ये शरीर,मन आणि आत्मा या तत्वांना पवित्र करण्याचा विचार आहे.असे मानाले जाते कि आहारातील निर्बंधाचे पालन करून आणि अध्यात्मिक पद्धतिचा अवलंबून करून,व्यक्ती त्यांचे शरीर डीटोक्स करू शकतात. मानसिक स्पष्टता वाढउ शकतात.तसेच परमातम्याशी त्यांचे आध्यात्मिक संबंध मजबूत करू शकतात.
- नववा दिवस कोणाच्या नवे आहे ?
उत्तर :- नवरात्रीचा नववा दिवस हा देवी सिद्धीदात्री च्या उपासनेला समर्पित आहे.सिद्धी या शब्दाचा अर्थ अलौकिक शक्ती आणि धात्री म्हणजे पुरस्कार देणारा.म्हणून असे मानले जाते कि देवी सिद्धीदात्रीच्या उपासनेने सर्व मनो कामना पूर्ण होतात.
- नवरात्रीत आपण काय खाऊ शकत नाही ?
उत्तर :- तुम्ही जर नव दिवस देवीच उपवास धरला असेल तर तुम्ही फास्ट फूड,पाकिटातील अन्न,तांदळाचे पीठ,रवा आणि कांदा,लसून,अंडी आणि मास अश्या सर्व तामसिक पदार्थापासून दूर राहिलेले पाहिजे.
- देवीचे 9 रूपाचे नावे कोणती ?
उत्तर :- आई दुर्गा आणि तिचे नव रूप 1) आई शैलपुत्री 2) आई ब्राम्हचारणी 3) आई चंद्रघंटा 4) आई कुष्मांडा 5) आई स्कंदमाता 6) आई कात्यायनी 7) आई कालरात्री 8) आई महागौरी 9) आई सिद्धीदात्री हि आईची नावे आहेत.
आई दुर्गा माते विषय जी काही माहिती मला माहिती होती ती मी माझ्या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. {navratri information in marathi}मित्रांनो माहिती हि आपल्याला कशी वाटली हे नक्की सांगा.तसेच आपल्या मित्रांना हि माहिती पाठवायला विसरू नका …धन्यवाद