संजय गांधी निराधार योजना संपूर्ण माहिती/Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023 – नमस्कार मित्रांनो, माझ्या किनारा मराठीचा या माझ्या blog मध्ये तुमच स्वागत आहे.आज आपण संजय गांधी निराधार योजना या योजने विषय संपूर्ण माहिती पाहणार आहोत.तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख नक्की वाचा.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023
Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023

 

जेणे करून तुमच्या लक्षात येईल कि नक्की काय आहे संजय गांधी  निराधार योजना या योजने  साठी काय पात्रता लागणार आहे. 
 
 

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra

 

संजय गांधी निराधार योजनेचे उद्देश काय आहे. कागदपत्रे काय लागणार आहे.अर्ज कसा भरायचा आहे.कोणाला या योजनेचा लाभ देण्यात येईल.इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

 
नक्की संजय गांधी निराधार योजना म्हणजे काय ?
 
आपण नेहमी पाहत असतो, आपले महाराष्ट्र सरकार राज्यामधील गरीब जनते साठी अनेक प्रकारच्या विविध योजना राबवत असते.
 
त्या पैकी संजय गांधी निराधार योजना हि एक,हि योजना म्हणजे महाराष्ट्र मध्ये निराधार पुरुष/महिला,अपंग,विधवा,घटस्पोट,झालेल्या महिला,अनाथ,विविध आजाराने बाधित असलेले महिला /पुरुष,परिक्त्या महिला,वेश्या व्यवसाय सोडलेल्या ज्या आर्थिक दृष्टीने कमजोर आहेत.
 
अश्या वरील महिला/पुरुष ज्यांना दैनंदिन गरजासाठी इतर कोणाकडे धाव घालण्याची गरज आणि कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. (Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra) अश्या प्रकारच्या योजनेला संजय गांधी निराधार योजना असे म्हणतात.
 
आता पाहूया संजय गांधी निराधार योजनेचे  उद्दिष्ट / उद्देश्य :-
 
 
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक साहाय्य देऊन त्यांना मदत देऊन त्यांना मदत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 
 
 

Sanjay Gandhi Niradhar Yojana 

 
 
( Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra ) संजय गांधी योजना हि कोणाला लागु करण्यात येणार आहे ? 
 
 
  • तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी ह्या योजनेची लाभारती होऊ शकते.

 

  • घटस्पोट प्रक्रियेतील किंवा घटस्पोट झालेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.अपवाद ज्यांना पोटगी मिळालेली नाही अश्या महिला.

 

  • 35 वर्षाखलील  अविवाहित स्री.

 

  • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी.

 

  • अत्याचारित / पिठीत  महिला.

 

  • तृतीयपंथी 

 

  • देवदासी 

 

  • अपंग : अंध,मुकबधीर,कर्णबधीर,मतिमंद,इत्यादी स्त्री – पुरुष 

 

  • क्षयरोग,कर्करोग,एड्स आणि कृष्टरोग यासारख्या आजारांमुळे स्वताचा घरखर्च चालउ न शकणारे  पुरुष- स्त्री .{Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra}

 

  • निराधार विधवा, निराधार महिला  तसेच निराधार परितक्त्या.

 

  • 18 वर्षा खालील अनाथ बालक.
 
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लागणारी पात्रता आणि अटी :
 
 
1 ] अर्ज करणारा हा महाराष्ट्राचा मुल रहिवाशी असावा लाभार्थी व्यक्तीचे वय हे साधारण 65 वर्षाखालील असणे आवश्यक आहे.
 
2 ]  अर्जदाराकडे उत्पनाचा कोणता हि मार्ग नसावा.
 
 
3 ]   65 वर्षावरील व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 
 
4 ]   अर्ज करणारा हा किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 
 
5 ]   अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील असणे आवश्यक आहे.
 
 
6 ]   मुलींच्या बाबतीत लग्न होई पर्यंत किंवा तिला नोकरी मिले पर्यंत ( शासकीय,निमशासकीय किंवा खाजगी ) 
 
 
 
7 ]   मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या पालक कुटुंबाला [Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra तिला मिळालेले अनुदान पुठे चालू ठेवण्यात येणार आहे.
 
8 ]   लाभार्थ्यांच्या उत्पनासह कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न (रू .21,000) हजार पर्यंत असेल तर अर्ज करणारा लाभार्थी हा या योजनेसाठी पात्र असणार आहे. 
 
9 ]    अपंगातील अस्थिव्यंग,अंध ,मुकबधीर ,कर्णबधीर ,तसेच मतिमंद या सर्व  प्रवर्गातील अपंगांना या योजनेचा लाभ मिलन्याकरिता त्यांचे एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे साधारण ( रु .21,000 ) रुपये असने आवश्यक आहे. 
 
 
पुठे ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे .त्यांची पुठील दर एक वर्षातून खालील काही गोष्टींची तपासणी केली जाईल.
 
 
1 ]   दरवर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च,या कालावधीत एकदा संबंधित लाभारात्यांनी त्यांचे जेथे खाते आहे त्या बँकेच्या मेनेजरकडे अथवा पोस्ट मास्तर कडे स्वतः हजर राहावे लागेल. त्यामुळे बँक मेनेजर तसेच पोस्ट मास्तर हे तुम्ही हयात असल्याची नोंद करतील.
 
2 ]   कोणत्याही कारणांमुळे लाभार्थी बँकेत हजर राहू शकला नाही तर त्या लाभार्थ्यांने  नायब तहसीदार तहसीलदार उप विभागीय अधिकारी ( प्रांत अधिकारी )यांचे समोर हजर राहून ह्यातीबाबाते प्रमाणपत्र संबंधित तहसीलदार कडे सादर करावे.
 
3 ]   कोणत्याही परिस्थितीत हयात प्रमाणपत्र ( लाईव्ह सर्टिफिकेट ) सादर केल्याशिवाय सदर लाभार्थ्यास दरवर्षी 1 एप्रिल पासून आर्थिक साहाय्य / निवृत्ती वेतन देण्यास येणार नाही.
 
 
संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अनुदानासाठी असलेल्या समाविष्ट्र जाती 
 
  • खुला वर्ग 
  • अनुसूचित जाती 
  • अनुसूचित जमाती 
  • इतर मागास वर्ग 
  • विषेस मागास वर्ग 
  • भटक्या जमाती 
 
 
संजय गांधी निराधार योजनेचे फायदे खालील प्रमाणे : 
 
या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी व्यक्तीस प्रतिमहिना 1000 /- रुपयांचे आर्थिक साहाय्य केले जाते.एका कुटुंबात या योजनेचे एका पेक्षा जास्त लाभार्थी असल्यास प्रती  महिना 1200 /- रु आर्थिक साहाय्य देण्यात येते.त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्ती हा सशक्त आणि आत्मनिर्भर होईल.
 
 
 
या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :
 
 
  •  अर्जदाराचा फोटो 
  • ओळखीचा पुरावा पारपतत्र 
  • pancard 
  • आधार कार्ड 
  • मतदान ओळखपत्र 
  • निमशासकीय ओळखपत्र 
 
    पत्ता पुरावा : 
 
ग्रामसेवक / तहसीलदार यांच्या कडून देण्यात येणारा रहिवासी असल्याबदलचा दाखला.
 
 
वयाचा पुरावा  :
 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • शिधापात्रीकेमध्ये अथवा निवडणुक मतदार यादीत नमूद केकेल्या वयाचा उतारा ग्रामपंचायतीच्या / नगरपालिकेच्या वहीतील उतार्याची साक्षांकित यादी.
रहिवासी दाखला : 
 
ग्रामसेवक ,तलाठी ,मंडळ निरीक्षक किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला 
 
 
अपंगाचे प्रमाणपत्र : 
 
  • असमर्थेचा / रोगाचा दाखला 
  • कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी दाखला Sanjay Gandhi Niradhar Yojana
  • तहसीलदार किंवा ग्रामसेवक / तलाठी यांच्या शिफारशीवरून दिलेला दाखला 
  • महिला व बाल कल्याण अधिकारी यांच्या कडून देण्यात आलेला दाखला 

 

 
 

 Sanjay Gandhi Niradhar 

 
अनाथ असल्याचा दाखला : 
 
ग्रामसेवक / प्रभार अधिकारी यांनी दिलेला प्रकल्प अधिकारी,एकात्मिक बालविकास सेवा अधिकारी  यांनी साक्षांकित केलेला दाखला.
 
 
संजय गांधी योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत : 
 
 
  • संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.  
  • अर्ज करून झाल्यावर विचारलेल्या कागदपत्रांची  PDF करून अपलोड करावी. हे केल्यावर अर्ज सबमिट करायचा आहे. 
  • अर्ज करतांना 33 रू /- रुपयाचे payment करायचे आहे.
  • payment झाल्यावर अर्ज 30 दिवसासाठी मंजुरीसाठी तहसीलदार कार्यालय मध्ये मंजुरी साठी जाईल. (Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra)
  • 30 दिवसातून देखील तुमचा अर्ज मंजूर झाला नाही तर तुमचे सर्व कागदपत्रे घेऊन तहसीलदार ऑफस ला जाऊन जमा करावे …..त्यानंतर तुम्हचा अर्ज हा मंजूर करण्यास येईल.

   

 
मित्रांनो, आपण या पोस्ट मध्ये संजय गांधी निराधार योजने “Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023” विषय संपूर्ण माहिती पाहिली आहे. 
 
आशा आहे तुम्हाला हि पोस्ट समजली असेल ….तुम्हाला पोस्ट उपयुक्त वाटत असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेयर करा. अशाच नवनवीन पोस्ट साठी मला फोलो करायला मात्र विसरू नका. धन्यवाद ! 

Leave a comment