वडपोर्णिमा,का केली जाते वडाची पूजा पहा संपूर्ण माहिती/vatpornima information in marathi

vatpornima information in marathi – ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजे वड पौर्णिमा, या दिवसी सर्व महिला या वट वृक्षाची पुजा करतात. वटवृक्ष हा मोरेसी कुळातला वृक्ष. वटवृक्षाची प्रत्येक पारंबी जमिनीपर्यंत जाऊन मुळ वृक्षाला आधार देते. वृक्षाचा विस्तार करते. तसेच बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी हि वट वृक्ष आपले अस्तित्व टिकवून ठेवत असतो. 

 

 

vatpornima information in marathi
vatpornima information in marathi

 

 

वाढतो,फुलतो भारतीय संस्कृती हि निसर्ग पूजा करणारी संस्कृती आहे. निसर्गामधील शक्तिंना त्याने देव मानले आहे. या मध्ये नदी, डोंगर, विविध प्राणी, पक्षी, वृक्ष यांची त्याने पूजा सुरू केली.

या पुजनातुन त्या गोष्टींच्या अंगी असणारी विशेष क्षमता आपल्या अंगी यावी ही धारणा, यातुनच वट वृक्षाची पुजा सुरु करण्यात आली, अनेक ऋषींना वट वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली असे आपण मानतो. (vatpornima information in marathi) वट वृक्षाच्या पानांपासून पत्रावळी – द्रोण बनवली जातात. 

vatpornima information in marathi

आयुर्वेदात या वृक्षाचे अनेक औषधी गुण सांगण्यात आले आहेत. मोठी सावली देणारा तसेच अनेक पशु – पक्षांना आसरा देणारा वृक्ष म्हणुन या वृक्षाला संबोधले जाते. 

तसेच मानवी जीवनात या वृक्षाचे खुप महत्वाचे स्थान आहे. वट वृक्ष मोठा झाल्यावर त्याच्या झाल्या पारुंब्या जमिनीच्या जाऊन  त्यांचे नवीन खोडात रूपांतर होते.

कितीही वादळ पाऊस झाला तरी हे झाड आपले अस्तित्व सोडत नाही. कोणत्याही परिस्थितीत आपले अस्तित्व कायम ठेवणारा हा अमर वृक्ष . म्हणुन माणूसही या वृक्षापासून अमरत्वप्राप्ती चे वरदान मागत त्याची पुजा करत असतो.

 

प्राचीन काळी मानवी जिवन हे संघर्षाचे होते. टोळ्यांमध्ये होणाऱ्या लढाया, हिंसाचार तसेच सत्तेसाठी वावरणारे अनेक योद्धा या सर्व गोष्टी मुले पुरुष जातीचे जिवन हे खुप धोक्याचे होते. 

त्या मुळे स्त्री हि आपल्या कुंकुच्या काळजीपोटी म्हणजेच आपल्या नवऱ्या भीतीने,वट वृक्षाप्रमाणे आपले वैवाहिक जीवनही अमर असावे. {vatpornima information in marathi}


vatpornima

ही त्या काळील स्त्री ची भावना होती. म्हणुन उन्हाळ्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही बहरणाऱ्या वट वृक्षाला फळ देऊन, या बहरलेल्या वट वृक्षाला पुर्णचंद्र दर्शन होणाऱ्या दिवसी अमरत्वचे दान मागुन स्त्री हि वट पौर्णिमेला पुर्ण श्रध्देने वडाची पुजा करत असते.

 

प्रत्येक कथेला कालांतरानं एक कहाणीची जोड लागते. त्या प्रमाणेच वट पौर्णिमा या दिवशीची ही एक कहानी खुप प्रसिद्ध आहे. या कथे विषय आता जानुया…

 

वटसावित्री पौर्णिमा…

 

सावित्री, मद्रदेशाचा राजा अश्वपती याची कन्या. सावित्रीने पती म्हणुन सत्यवानाची निवड केली होती. सत्यवानाचे वडील द्रुमत्मसेन हे वृद्ध आणि आंधले होते. त्यामुळे त्यांचे राज्य हे शत्रूने घेतले होते. या सर्व कारणांमुळे सत्यवानाला आपल्या माता – पिता सोबत वनवास प्राप्त झाला होता.

 

सत्यवान हा अल्प आयुशी आहे. तसेच लग्नानंतर बरोबर एक वर्षांनी त्याचा मृत्यू होणार आहे. हे नारदमुनीनी सावित्रीला आधीच सांगितल होत. नारदमुनिंनकुन हि बातमी कळल्या नंतरही सावित्रीने सत्यवान बरोबर विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.

 

‘काहीही असेल तरीही मी सत्यवानाशीच विवाह करणार’ हा तिचा संकल्प पाहून अश्वपती राजाने तिचा विवाह सत्यवाना बरोबर लावून दिला.

 

त्यानंतर वृद्ध सासु सासरे यांची ती मनोभावे सेवा करत असत. आपल्या सतत कष्टांनी व प्रेमळ वागण्यांनी ती सत्यवाणाला ही प्रिय झाली. तसेच सावित्रीला वणात राहुन तेथील औषधी झाडे तसेच कंदमुळे यांची तीला चांगलीच जाणीव झाली होती.

 

वणवासातील गोड सहवासात बगता बगता एक वर्ष संपून गेल. सावित्रीला नारदाच्या त्या भविष्य वानीची जाणीव होतीच म्हणुन तिने अनेक व्रत खडतर केले, उपवास केले. रात्रंदिवस परमेश्वराची प्रार्थना केली. त्रिरात्र व्रत केले. एके दिवशी सत्यवान बरोबर सावित्रीही वनात गेली. दोघांनी कंदमुळे जमवली.

 

 सिमधांसाठी लाकडे तोडण्यास सत्यवान वडाच्या फांदीवर चढला. फांदीवर कुराड चालु लागला. पण अचानक त्याचा तोल सुटला आणि तो त्या फांदीवरून खाली पडला. आणि तेथेच त्याने प्राण सोडला. ते पाहून सावित्री ही बेशुद्ध झाली. [vatpornima information in marathi] तिच्या आत्म्याला प्राणजोत स्पष्ट दिसत होती. 

 

कारण ती एक साध्वी प्रतिव्रता होती. व्रताच्या पुण्याईमुळे तिला ते सर्व दृश्य दिसत होत. ती सत्यवानाच्या प्राण ज्योति मागे मागोमाग जात राहिली. तेव्हा यमराज म्हणाले, मुली, तुझ्या पतीनिष्टेबद्दल मला आदर आहे. पण तु पती शिवाय अन्य मागणी माग. मी तो हट्ट अवश्य पुर्ण करीन. 

 

vatpornima information

मग सावित्री ने आपल्या सासऱ्याला दृष्टी मागितली तसेच गेलेले राज्य पुन्हा मागितले. आपल्या पित्याला पुत्र मागितले तसेच शेवटी मलाही पुत्र प्राप्ती व्हावी असे वरदान मागितले. असा आशीर्वाद यमा जवळ मागितला.

 

सावित्रीच्या विनयशील व गोड बोलण्यावर यम देवता खूपच प्रसन्न झाले. पती शिवाय तिच्या त्या अन्य मागण्या त्याने भराभर कबूल केल्या आणि शेवटी तीला पुत्रवती भव असा आशीर्वाद यमाने दिला. सावित्री ने मोठया प्रयत्नात सत्यवानाचे प्राण परत वाचवले. अशी हि प्रचलित दंत कथा आहे. 

 

आज मात्र आपण ज्या वट वृक्षाकडे अमरत्व मागत आहे. ते वृक्ष आपण आपल्या हातुन तोडत आहोत. या गोष्टी कडे ही लक्ष द्यायला पाहिजे…..{vatpornima information in marathi}

तुम्हाला वट पौर्णिमा काय ते नक्की समजले असेल.माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा ..आपल्या मित्रांना शेयर करायला मात्र विसरू नका.अशीच माहिती साठी आपल्या किनारा मराठीचा.com या site ला मात्र visit करायला मात्र विसरू नका……धन्यवाद 

Leave a comment